शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

बीडजवळ शिवशाही बसला अपघात, 6 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 11:32 AM

लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई-केज रोडवरील होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले.

केज(बीड) : लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई-केज रोडवरील होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (1 मे) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास झाला. राज्यात अलिशान शिवशाही बसला झालेला हा पहिलाच अपघात आहे. सध्या लोखंडी सावरगावपासून मांजरसुंबापर्यंत महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून लहान-मोठ्या अपघातांचे सत्र सातत्याने सुरू आहे. मंगळवारी पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस (एमएच ०९ ईएम २४६८) होळच्या पुढे आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अरुंद रस्त्याच्या खाली उतरल्याने उलटली.

या अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय २६, रा. उंडेगाव), रेणुका कल्याण माळी (वय ३०, माळी चिंचोली) आणि अमर जियाउद्दीन सिद्दिकी (वय ९, लातूर) हे तिघे गंभीर जखमी झाले तर पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय ५६, केज), राजू सानुजी इवले (वय २६, औरंगाबाद) आणि सतीश गणपत गव्हाणे (वय ३०, बोरगाव) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बसमध्ये प्रवाशांची कमी संख्या आणि बसचा वेग नियंत्रणात असल्याने मोठी हानी झाली नाही. 

अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेत रुग्ण पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांना बोलावून घेऊन सर्व यंत्रणा तयार ठेवली होती. स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. कचरे यांनी स्वतः उपस्थित राहून जखमींच्या उपचारांवर लक्ष दिले.

होळ ग्रामस्थ मदतीला धावले,जेसीबीचा केला वापर अपघाताची माहिती मिळताच नेताजी शिंदे, विजय केंद्रे यांच्यासहित होळच्या अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. मात्र ढाकेफळ येथील शिक्षिका रेणुका माळी आणि लातूरचा अमर सिद्दिकी हे दोघेजण बसखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. अखेर नंदकिशोर मुंदडा यांनी होळ येथील संतोष शिंदे यांची जेसीबी मशीन अपघातस्थळी पाठविली. त्यानंतर ग्रामस्थांनी बसखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. केज आणि अंबाजोगाई येथील १०८ रुग्णवाहिकातील डॉक्टर आणि चालकांनी जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. अंबाजोगाई येथील गणेशभैय्या कदम युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड