शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

दुष्काळात महावितरणचा भारनियमनाचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:30 AM

तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यात १९२ गावांत पाणीटंचाई : १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; ८ विहिरींचे अधिग्रहण

गेवराई : तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचणी येत आहे.तालुक्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाणीपातळी खोलवर गेलेली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पङल्या आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ‘अपडाऊन’मध्येच व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ कार्यालयीन कामाला देत येत नाहीत. इकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील शंभर गावांमध्ये जवळपास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.भारनियमनामुळे रात्री-बेरात्री जागरणतालुक्यात १०७ टँकरने विविध गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता नगर परिषद जलकुंभ मधून ६५ टँकर व अन्य १८ भागातील विहिरींमधून पाणी भरून आणतात. परंतु महावितरणकडून ८ तासांचे भारनियमन असल्याने रात्री-बेरात्री गावात टँकर येते. त्यामुळे रात्री टँकरची वाट पाहत जागरण करावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.पाणी शुध्दीकरणाकडे दुर्लक्षगावांना टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याच्या शुध्दीकरणाकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. याविषयी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाºयाने संगितले, ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुध्दीकरणाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायतकडे ब्लिचिंग पावडर आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले.तालुक्यात टँकरग्रस्त गावे ८३ असून तालुक्यात १०७ टँकर सुरूअसून, यामध्ये शासकीय ५, खाजगी १०२ टँकर सुरूअसून मंजूर खेपा २११ आहेत.भविष्यात तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार असून, शासकीय पातळीवर उपयोजना सुरू असल्याची गेवराई येथील पंचायत समिती येथील नूतन गटविकास अधिकारी एस.बी. मावळे यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाईmahavitaranमहावितरण