बीड : शहरात अनधिकृत नळ जोडणी घेऊन फुकटात पाणी वापरणाऱ्यांची आकडेवारी तब्बल १२ हजारावर असल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर कारवाई करण्यास मात्र पालिका आखडता हात घेत आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे लाखो रूपयांचा करही बुडत असल्याने बीड पालिका तोट्यात जात आहेत.शहराचा विस्तार, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १३४ कोटी रूपयांची अमृत योजना कार्यान्वित असून, २४० कि.मी.पर्यंत पाईपलाईनचे काम प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत १४० कि.मी.पर्यंत काम पूर्णही झाले. जवळपास २०४९ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, या दृष्टीने ही योजना तयार केलेली आहे. याच अनुषंगाने बीड पालिकेकडून सध्या डोअर टू डोअर जावून सर्वेक्षण केले जात आहे. घरांची संख्या, नागरिकांचे नाव, नळ आहे का? आहे तर पावती आहे का? पावती नाही तर का नाही? कर भरला का? नळ जोडणी वैध की अवैध? याबाबत माहिती घेतली जात आहे. यासाठी पालिकेने विशेष तीन पथकांची नियुक्तीही केली जात आहे. या पथकांच्या अहवालातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत.जोडण्या २८ हजार, आवश्यकता ५० हजारचीबीड शहरात पालिकेच्या नोंदणीनुसार जवळपास २८ हजार नळ जोडणी आहेत. प्रत्यक्षात आजस्थितीला ४० हजार जोडणी आहेत. जवळपास १२ जोडणी अनाधिकृत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस विस्तार वाढत चालल्याने ५० हजार जोडण्यांची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्य जलवाहिनीलाचधनदांडग्यांची नळ जोडणीबीड शहरातील मुख्य जलवाहिनीलाच काही राजकारणी व धनदांडग्या लोकांनी नळ जोडणी घेतली आहे. त्यामुळे कोठेही पाणी सुटले तरी या धनदांडग्यांना पाणी मिळते. विशेष म्हणजे या जोडण्यांची पालिकेकडे नोंदही नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धक्कादायक ! बीडमध्ये १२ हजार नळ जोडणी अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:21 AM
शहरात अनधिकृत नळ जोडणी घेऊन फुकटात पाणी वापरणाऱ्यांची आकडेवारी तब्बल १२ हजारावर असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देफुकटात पाणी वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी आखडता हात