बीड : जिल्ह्यात रविवारी 128 जणांचे रिपोर्ट कोरोना आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी एक आरोपी पॉझिटिव्ह आल्यानंतर कारागृहातील 234 आरोपींची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज दिवसभरात 128 जणांचे पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. मात्र, आरोपींसाठी पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे येतात असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा कारागृहात आरोपी नेण्यापुर्वी त्यांना 15 दिवस बाहेरच्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येते. त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना कारागृहात पाठवण्यात येते. असे असताना जिल्हा कारागृहात कोरोना शिरलाच कसा याची चौकशी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी अधिकारी कर्मचारी कोरोना चाचणी केली होती ते सर्व निगेटिव्ह आले होते. त्यामुळे पुन्हा रविवारी तपासणी केली नसल्याचे कारागृह अधीक्षक महादेव पवार यांनी सांगितले.