अंबाजोगाई - बीड येथील नातेवाईकांनी चुकुन नेलेल्या त्या मृतदेहाचा प्रवास पुणे ते अंबाजोगाई व पुन्हा अंबाजोगाई ते बीड येण्या जाण्यामुळे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास झाला. या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर सोमवारी त्या मयत व्यक्तीवर बोरीसावरगाव येथे अंत्यसंस्कार झाले. तर त्या बीडच्या तरूणावर रविवारीच अंत्यविधी झाला. या प्रकारामुळे नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात त्या दिवशी सेवेत असणार्या निवासी वैद्यकीय अधिकार्यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे.
निमोनियामुळे बीड येथून आलेल्या 35 वर्षीय तरूणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात मृत्यू झाला. बीड येथून अंबाजोगाईत पाठविण्यात आलेला हा रूग्ण बीड येथे पॉझिटिव्ह आढळून आला होता. परंतु स्वारातीमध्ये तो निगेटिव्ह आढळून आला. शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारच्या दरम्यान त्याचा मृतदेह शवआगारात ठेवल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा समजून दुसर्याचा मृतदेह घेवून गेले. परंतु घरी गेल्यानंतर तो मृतदेह आपला नसल्याचे लक्षात येताच तो परत अंबाजोगाईला आणण्यात आला. आणि बोरीसावरगाव येथील 64 वर्षीय मृतदेह बीडला नेलेला तो परत अंबाजोगाईला आणला आणि त्यांचा मुळ मृतदेह घेवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु बोरीसावरगावातील हे रूग्ण पुणे येथे मयत झाल्यामुळे त्यांचा मुलगा फ्रान्सहून येणार असल्यामुळे हा मृतदेह स्वारातीच्या शवआगारात ठेवण्यात आला होता.
बोरीसावरगाव येथील माधवराव दाजीसाहेब देशमुख वय 64 वर्षे हे आपल्या मुलाकडे फ्रान्सला गेले होते. एक महिन्यापुर्वी त्याच्या भावाची बायको मयत झाल्यामुळे ते पुण्याला आले होते. भावजयीचा अंत्यंविधी उरकल्यानंतर माधवराव देशमुख यांना निमोनियचा त्रास जाणवू लागला. यानंतर नातेवाईकांनी त्यांना पुण्याच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माधवराव यांचा मुलगा फ्रान्स येथुन येणार असल्यामुळे त्यांचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वारातीच्या शवआगारात शनिवारी ठेवण्यात आला. मुलगा सोमवारी येणार असल्यामुळे रूग्णालयाचे सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून हा मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु बीडच्या रूग्णाचा मृतदेह नेण्याऐवजी माधवराव देशमुख यांचा मृतदेह नेण्यात आला. घरी गेल्यानंतर हा मृतदेह आपला नसल्याचे लक्षात येताच तो परत अंबाजोगाईला आणण्यात आला. व त्यांचा मुळ मृतदेह घेवून नातेवाईक बीडला गेले. घरी मृतदेह उघडल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला अन्यथा अंत्यसंस्कार झाले असते तर मोठी खळबळ उडाली असती. आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता देशमुख यांचे नातेवाईक स्वाराती मध्ये येवून त्यांचा मृतदेह बोरीसावरगाव येथे नेवून सकाळी 11.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मृत देहाचे विधीनुसार अंत्यसंस्कार झाले असले तर मृत्य देह आदलाबदलीमुळे संपुर्ण खळबळ उडाली होती.
त्रिसदस्यीय समितीची चौकशी सुरूमृदेहाच्या आदला बदल प्रकरणी स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी त्रिसदस्यीय स्थापन केली असून या समितीत डॉ.शंकर धपाटे, डॉ.दिपाली देव, डॉ.विश्वजीत पवार हे चौकशी करत असून यातील दोषींचा अहवाल अधिष्ठातांकडे पाठविणार आहेत.
निवासी अधिकार्याचा पदभार काढलामृतदेह आदला बदल प्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद दोडे यांचा पदभार काढला असून त्यांच्या जागेवर डॉ.विश्वजीत पवार व डॉ.रविकुमार कांबळे यांची नियुक्ती केली असून हा प्रकार यापुढे घडणार नाही अशी नवनियुक्त अधिकार्यांना सूचना केली आहे.
विनंतीवर शवागारात मृतदेह ठेवण्याची परवानगीएखाद्या खाजगी रूग्णालयामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागणार असतील तर त्याच्या मृतदेहाची विटंबना होवू नये म्हणून शासकीय रूग्णालयाच्या शव आगारात ठेवण्याची कायदेशिर तरतुद आहे. त्या तरतुदीनुसारच हा मृतदेह ठेवण्यात आला होता.- डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती अंबाजोगाई