शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

धक्कादायक ! चक्क जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीवर ‘आंबट चाळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:21 PM

मध्यरात्री दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर आंबट चाळे करताना पकडले गेले.

ठळक मुद्दे या प्रकाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.

बीड : जिल्हा रूग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरूवारी मध्यरात्री दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर आंबट चाळे करताना पकडले गेले. या प्रकाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.

बीड जिल्हा रूग्णालयाच्या दोन इमारती आहेत. एका इमारतीत ओपीडी आणि प्रशासकीय कारभार चालतो. तर दुसऱ्या अ‍ॅडमिट असलेल्या रूग्णांवर उपचार केले जातात. गुरूवारी मध्यरात्री वॉर्ड क्रमांक सहा जवळील जिन्यावरून दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर गेले. तेथे मद्यप्राशन करून आंबट चाळे केल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. हा प्रकार एका कर्मचाऱ्याला समजताच त्यांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. बॅटरीच्या उजेडात रक्षकांना हे तिघेही तेथे आढळले. विशेष म्हणजे एक पुरूष आणि महिला नग्न अवस्थेत होते. त्यानंतर रक्षकांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. पहाटे चार वाजेच्या सुमारास या तिघांनाही शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कोणाची तक्रार नसल्याचे सांगून त्या सर्वांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

प्रकरणात झाली ‘तडजोड’?गैरप्रकार करणाऱ्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नसल्याचे सांगत सोडून देण्यात आले. यात ‘लाख’मोलाची ‘तडजोड’ झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे त्यांना सोडून देताना रूग्णालय प्रशासनाची तक्रार आहे की नाही, हे विचारण्याची तसदीही पोलिसांनी घेतलेली नाही.

माहितीच्या लोकांचेच गैरकृत्यपोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही लोक तेथेच असतात. खाजगी वाहन चालक असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सर्व लोक कायम रूग्णालयाच्या आवारातच वावरत असतात. त्यांनाच रूग्णालयाची सर्व माहिती असल्याने त्यांनी नजर चुकवून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलेची नसली तरी रूग्णालयाने करावी तक्रारपोलिसांनी महिलेची तक्रार नसल्याचे सांगून सर्वांना सोडून दिले. मात्र, विनापरवाना शासकीय इमारतीत जाणे, मद्यप्राशन करणे व इतर गैरप्रकार करणे चुक आहे. त्यामुळे रूग्णालय प्रशासन तक्रार करू शकते. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता यामध्ये रूग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासन कशाप्रकारे कारवाई करतात, हे वेळच ठरविणार आहे.

पोलिसांकडे रीतसर तक्रार देणार  जिल्हा रूग्णालयाच्या छतावरील गैरप्रकाराबद्दल समजले आहे. याबाबत पोलिसांकडे रितसर तक्रार करीत आहोत. या प्रकरणाची शहानिशा करीत आहोत.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

तिघांना ताब्यात घेतले जिल्हा रूग्णालयातून फोन येताच एक महिला व दोन पुरूषांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सर्वांनी मद्यप्राशन केलेले होते. महिलेची तक्रार नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले.- घनश्याम अंतराप, सपोनि, शहर पोलीस ठाणे बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस