शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
2
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
16
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
17
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
18
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2024 3:11 PM

बनावट औषध पुरविणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा करणारी एक टोळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तर अशी बनावट औषधे पुरविणारे रॅकेटही आगामी काळात उघडकीस येईल, अशी शक्यता समोर येत आहे.

मराठवाड्यातील रुग्णांचे आधारस्तंभ म्हणून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयात दररोज किमान १६०० ते १८०० रुग्ण उपचारासाठी येतात. अशा या रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची तक्रार समोर आली आहे. स्वाराती रुग्णालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी स्वारातीच्या औषध भंडारास भेट दिली. त्यांचे सहायक प्रशांत पुरणवाड व ज्ञानोबा राठोड या फार्मासिस्ट यांनी रुग्णालयातून ॲझिमॅसिन-(५००) (AZIMCIM-५००) या औषधांचे सॅम्पल नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांची तपासणी होऊन २३ ऑक्टोबर २०२४ रोजी आलेल्या अहवालात सदरील औषध हे रुग्णांसाठी निष्क्रिय व बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर या औषधांचा पुरवठा विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर यांच्याकडून झाल्याचे समोर आले. त्यांनी रुग्णालयास २५ हजार ९०० टॅबलेटचा पुरवठा केला होता.

पुढे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असता काबीज जनरिक हाऊस मीरा रोड (ठाणे) फार्मसिस्ट बायोटेक्ट, टेनामेंट डिंडोली (सुरत), ॲक्वेटिस बायोटेक प्रा. लि. नालासोपारा (भिवंडी) यांनी ही बनावट औषधे रुग्णालयास पुरविली असल्याचे समोर आले आहे. बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील (कोल्हापूर), मिहीर त्रिवेदी (नारपोली, भिवंडी), द्विती त्रिवेदी (डिंडोली, गुजरात) व विजय शैलेंद्र चौधरी (मीरारोड, ठाणे) या चौघांविरुद्ध बनावट औषधांचा पुरवठा करून फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कांबळे करीत आहेत.

औषधांचे घटक नसणाऱ्या औषधांचा पुरवठास्वाराती रुग्णालयास पुरविण्यात येणारी ॲझिमॅसिन ५०० ही गोळी अँटिबॉयेटिक म्हणून रुग्णांसाठी देण्यात येत होती. मात्र, या गोळीमध्ये औषधांचे जे घटक आवश्यक आहेत, ते घटक नसल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आले. म्हणून या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.- मनोज पैठणे, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, बीड

औषध पुरवठा थांबविण्यात आलास्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून औषध पुरवठा होतो. त्यानुसार ही औषधे अंबाजोगाईत रुग्णांसाठी आली होती. मात्र ही औषधे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा औषध पुरवठा थांबविण्यात आला. हे औषध वरिष्ठ पातळीवरून बंद करण्यात आले आहे.- डॉ. शंकर धपाटे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारी