अंबाजोगाई : दुचाकीवरून आलेल्या दोघा तरु णांनी पाण्याची बाटली घेण्याचा बहाणा करत किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे दागिने हिसकावून पळ काढला. पोलिसांनी तत्परतेने शोध घेत तिघा जणांच्या टोळीतील एकास ताब्यात घेतले असून दोघा जणांची ओळख पटविली आहे. त्या दोन चोरट्यांचा कसून तपास सुरु आहे.खोलेश्वर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक ज्ञानोबा सुरवसे यांचे शहरातील केशवनगरमध्ये घर आहे. घरातच त्यांची पत्नी राजकन्या या किराणा दुकान चालवतात. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास दुकानासमोर दुचाकीवरून २० ते ३० वयोगटातील दोघे तरुण आले. त्यापैकी एकाने गाडी चालू ठेवली तर दुसरा गाडीवरून उतरून दुकानात आला आणि पाण्याची बाटली व कुरकुरेची मागणी करत ५० रु पयांची नोट सुरवसे यांच्याकडे सरकावली. त्यांनी पाण्याची बाटली देताच यापेक्षा अधिक थंड पाहिजे अशी मागणी त्या तरु णाने केली. त्यामुळे आधीची बाटली खाली ठेवण्यासाठी सुरवसे खाली वाकताच त्या तरु णाने त्यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र आणि सोन्याची साखळी असे ४५ हजारांचे दागिने हिसकावून घेत साथीदारासोबत दुचाकीवरून पळ काढला. यावेळी सुरवसे यांनी आरडाओरडा करताच त्यांचे पती ज्ञानोबा आणि इतर लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक खंडारे करत आहेत.एकास पकडण्यात यशदरम्यान या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी तातडीने अंबाजोगाई व परळी पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्याकामी लावले. चोरटे आणि गाडीच्या वर्णनावरून परळी पोलिसांनी एकास टोकवाडीपासून पाठलाग करून परळीच्या इराणी वस्तीत पकडले.सुरु वातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यांची तिघांची टोळी असून दोघे दुचाकीवरून चोरीचे काम करतात आणि तिसरा थोड्या अंतरावर थांबून पाळत ठेवतो.गुरुवारच्या घटनेतही दोघा जणांनी चोरी केली आणि तिसऱ्याकडे येत त्याला स्वत:जवळील गाडी देऊन त्याच्याकडील चारचाकी घेत कर्नाटकच्या दिशेने निघून गेले. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दुकानदार महिलेचे दागिने पळविणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:14 AM
दुचाकीवरून आलेल्या दोघा तरु णांनी पाण्याची बाटली घेण्याचा बहाणा करत किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे दागिने हिसकावून पळ काढला.
ठळक मुद्देतासाभरात पोलिसांची कारवाई : ग्राहक बनून दुचाकीवर आले होते चोरटे