गेवराई : भारतातील साडेतीन पीठापैकी एक मुख्य पीठ असलेले श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज देवस्थानाचे विशेष महत्त्व आहे. दरम्यान शनिवारी शनि अमावास्येनिमित्त याठिकाणी राज्यासह आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह अन्य ठिकाणाहून भाविकांनी शनिवारी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ‘शनि महाराज की जय’ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिस बंदोबस्तात हजारो भाविकांनी शनि महाराजांचे रांगांमध्ये शिस्तीत दर्शन घेतले.तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे शनि अमावस्या निमित्त ४ मे रोजी दिवसभर भाविक हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी हजर होते. यावेळी शनिभक्तांनी शिस्तबद्ध पध्दतीने रांगेत उभा राहून दर्शन घेतले. यावेळी ‘शनि महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. तसेच या ठिकाणी पानफुल, नारळ, तेल, रेवडीसह खाऊची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले होते.शनि अमावस्यानिमित्त रूद्र अभिषेक, शनि शांति, शनिजप, नवगृहजप तसेच अभिषेक करण्यासाठी तसेच शनि महाराजांच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी येण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून गेवराई, बीडसह आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच खाजगी मोटारसायकल व चारचाकी वाहनांनी ही भाविक आले होते. त्यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था चकलांबा पोलिसांनी केली होती. यावेळी बीड, गेवराई, चकलंबा, उमापूर व तलवाडासह आदी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान वाहतूक व्यवस्था व भाविकांच्या दर्शन रांगा सुरळीत करण्यासाठी चकलंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्यासह त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी व शनि महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
श्रीक्षेत्र राक्षसभुवनला शनि अमावास्येनिमित्त गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:28 AM
भारतातील साडेतीन पीठापैकी एक मुख्य पीठ असलेले श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज देवस्थानाचे विशेष महत्त्व आहे.
ठळक मुद्देशिस्तीत दर्शन। शनि महाराजांचा जयघोष ; पोलिसांकडून पार्किंगची व्यवस्था