बीड: बीडचेजिल्हाधिकारी अविनाश पाठक हे मसुरी येथे महिन्याभराच्या प्रशिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काढला आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे २ ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यामुळे पाठक यांना २९ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड या अतिरिक्त कार्यभार विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.