केज: तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे शासकीय नियम व सामाजिक अंतराचे पालन करत पन्नास लोकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली ३०मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने मंदिरातील गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील संत तुकाराम महाराच मंदिरात बिजोत्सवास भाविकांना या वर्षी येता आले नाही. परंतू सोशल मिडियाच्या माध्यमातून पावनधाम येथील संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घरबसल्या घेता आला. दरवर्षीच्या प्रथेनूसार गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्री यांचे काल्याचे कीर्तन झाले.यावेळी नामदेव गोरे यांच्या वतीने तयार केलला प्रसाद स्वयंसेवकांच्या हस्ते सामाजिक अंतराचे पालन करत भाविकांना घरपोच करण्यात आला. ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानच्या वतीने अमोल महाराज, जनार्धन महाराज चलवाड,अशोक महाराज,हनुमंत महाराज शिरसट,पारेकर बप्पा यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
300321\deepak naikwade_img-20210330-wa0002_14.jpg