लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात यात्रेत कानी पडत होता. राज्यासह इतर राज्यातून याठिकाणी ५० दिंड्या येतात. काही दिंड्यांचा प्रवास सुरु आहेत, तर काही दिंड्यांचे बुधवारी सकाळीच आगमन झाले.दरम्यान गुरुवारी दुपारी घाटमाथ्यावर रिंगण सोहळा, सायंकाळी महापूजा, धर्मसभा, कीर्तन होणार आहे. यात्रेनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी गुरुवारी पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.श्रीक्षेत्र कपिलधार येथे संतश्री मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी मागील तीन दिवसांपासूनच भाविकांची रेलचेल सुरु झाली. तर एक महिन्यापासून विविध राज्यातून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. यात्रा परिसरात विद्युत व्यवस्था बार्शी येथील ग्रुपकडून केली आहे. तर ट्रस्टचे तीन जनरेटर आहेत. महावितरणकडून यात्रा परिसरात ४ दिवस २४ तास विद्युत व्यस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक येथे सज्ज ठेवण्यात आले आहे. बीडमार्गे येणाऱ्या दिंड्यांचे बीड बायपास, मांजरसुंबा घाट कमान, पाली येथे स्वागत करण्यात आले. सहभागी भाविकांना अल्पाहार, चहा, पाण्याची सोय विविध संघटना, वीरशैव समाजबांधवांकडून करण्यात आली. या सेवेत किसनराव नाईकवाडे, भरत झांबरे, वीरशैव गणेश मंडळांसह भाविकांचा सहभाग होता.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुकानांना भेटी४देवस्थान परिसरात स्वच्छतेसाठी २० कामगार नियुक्त केले असून धुरळणी करण्यात आली आहे, तर जागोजागी डस्टबिन ठेवण्यात आल्या आहेत.४ यात्रा परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देऊन संबंधित विक्रेत्यांना स्वच्छता राखण्याच्या व दक्षतेच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अनिकेत भिसे व इतर अधिकाºयांनी दिल्या. मंदिर परिसरात प्रसाद आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत.१० हजार भाविकांची सोय४यात्रेनिमित्त जवळपास दहा हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली असून याशिवाय देवस्थानच्या शेतजमीन परिसरातही सुविधा करण्यात आली आहे.अन्नदानाचा महायज्ञ४यात्रेनिमित्त नांदेड येथील सारथी संघटनेच्या वतीने ३ दिवस २४ तास अन्नदान सेवा दिली जाते. खिचडी आणि बुंदीचा महाप्रसाद भाविकांना वाटप केला जातो. २२ आचारी व संघटनेचे स्वयंसेवक असे १०० जण एक ट्रक बासमती तांदूळ व एक ट्रक साखरेसह आले आहेत. महाप्रसाद महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.१६ सीसीटीव्ही कॅमेरे४कपिलधार यात्रा परिसरात यंदा सीसीटीव्ही कॅमेºयांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. १६ सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित आहेत.शिवाचार्यांचीविशेष व्यवस्था४श्रीक्षेत्र कपिलधार येथे ५० हून अधिक शिवाचार्य येत आहेत. त्यांची विशेष स्वतंत्र व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र कपिलधार यात्रेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:31 AM
शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात यात्रेत कानी पडत होता. राज्यासह इतर राज्यातून याठिकाणी ५० दिंड्या येतात. काही दिंड्यांचा प्रवास सुरु आहेत, तर काही दिंड्यांचे बुधवारी सकाळीच आगमन झाले.
ठळक मुद्देमन्मथ माऊलींचा गजर : शिवाचार्यांसह ५० दिंड्यांचे आगमन; आज महापूजा, धर्मसभा