पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई शहरातही ‘एकच लक्ष्य, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करून सर्वसामान्यांचे जीवन करू मस्त’, ‘मोदी सरकार जनतेची करतेय मस्करी, युवक काँग्रेस देणार उत्तर घेऊन जनतेची स्वाक्षरी’ ही घोषवाक्ये घेऊन अंबाजोगाई शहरात युवक काँग्रेसतर्फे शहरातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी या अभियानास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध नाेंदविण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक सुनील व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे, युवक काँग्रेस केज विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव, राणा चव्हाण, सुनील वाघाळकर, दिनेश घोडके, विशाल पोटभरे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाई व इंधन दरवाढीविरोधात जनतेत मोठा रोष - राजकिशोर मोदी
बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई शहरात स्वाक्षरी अभियान गुरुवारी राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोदींकडून फाॅर्मवर स्वाक्षरी करून करण्यात आली. त्यानंतर अंबाजोगाई शहरातील विविध ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. स्वाक्षऱ्या करताना लोकांमध्ये भाजप विरोधात प्रचंड आक्रोश दिसून आला. यापुढे देखील या मुद्द्यांवर विद्यार्थी, युवक आणि महिला काँग्रेसच्या माध्यमातून प्रचंड जनआंदोलन करणार आहोत. जनतेचा हा रोष केंद्र सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी म्हणाले.
290721\1756-img-20210729-wa0049.jpg
काँग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात असलेल्या स्वाक्षरी अभियानाचा प्रारंभ काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या स्वाक्षरीने झाला.