जिल्ह्यातील २ हजार ८४५ संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात १५५ जण पॉझिटिव्ह आले, तर २ हजार ६९० निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १८, आष्टी ३५, बीड २०, धारुर ११, गेवराई १३, केज २१, माजलगाव ३, परळी ३, पाटोदा ५, शिरुर १९ व वडवणी तालुक्यातील सातजणांचा समावेश आहे. दिवसभरात ४७६ जण कोरोनामुक्त झाले. गत २४ तासांत जिल्ह्यात सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.
आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. पैकी ८३ हजार ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत २०५८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ६४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीइओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.