लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करु, शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन, शब्दें वाटू धन जनलोका’ संत तुकोबांनी केलेले हे वर्णन विमल माळी या साठीतल्या अल्पशिक्षित कवयित्रीला तंतोतंत लागू होते. काळया मातीत राबत आयुष्यभर संघर्ष करणाºया विमलबार्इंचा हुंकार शब्दबद्ध झाला अन् पाहता -पाहता त्यांनी साडेपाचेशहून अधिक काव्यरचना केल्या. मनातले भाव ताला- सुराचा साज चढवित शब्दबद्ध करण्याची हातोटी हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.मराठवाडा साहित्य संमेलनात त्यांच्या काव्यरचनेतील अस्सल मराठी बाणा सोमवारी भलताच भाव खाऊन गेला. अणगर (ता. मोहोळ जि. सोलापूर) हे त्यांचे गाव. मराठवाडा साहित्य संमेलनासाठी त्या खास अणगरहून अंबाजोगाईला आल्या. त्या केवळ दुसरीपर्यंत शिकलेल्या. लग्न होऊन सासरी आल्या अन् संसारात गुरफटल्या. पती सिद्धराम माळी व एक मुलगा असा तिघांचा छोटा प सुखी परिवार. गाठीला पाच एकर जमीन; पण ती कोरडवाहू. आयुष्यभर शेतात राबणाºया विमल माळी यांना कविता कोणी शिकवली नाही की त्यांनी त्यासाठी वेगळे काही केले.त्या म्हणतात, पाच वर्षांपूर्वी शेतात काम करताना आरक्षणावरुन सहज एक कविता सुचली, शब्दबद्ध केली. सारे काही आपसूकच येते. ते कसे जमते मलाही नाही उमगत; पण जे जगते, जे पाहते ते मांडण्याचा माझा प्रयत्न असतो, असे त्या म्हणाल्या.सह्याद्रीच्या कड्याकाड्यामधून विजयी शिव खडे...अजून माज्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाहूनि पुढे, अशा पद्धतीने शिवबाचा पराक्रम त्यांनी कवितांमधून साकारला आहे तर आला रे मेघराज गाजत वाºयाचा अश्व दौड धागाकडे झेपावत..विजेचा चाबूक फटकारे चमकवीत सृष्टीचा मातीचं सुगंध फैलावत शेतीविषयीचे चित्र स्पष्ट केले आहे. संमेलनात त्यांनी ताला सुरात कविता गायल्या, तेव्हा रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.‘हुंकार काळ्या आईचा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह त्यांनी पाच वर्षांपूर्वी प्रकाशित केला अन् त्याला वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आता दुसºया आवृत्तीची तयारी सुरु आहे. आत्मचरित्र तसेच काही कवितासंग्रह प्रकाशित होणार आहेत. सध्या त्यांना साडेपाचशे स्वलिखित कविता तोंडपाठ आहेत.
अल्पशिक्षित विमलबार्इंनी जिंकले व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:28 PM
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करु, शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन, शब्दें ...
ठळक मुद्देतालासुरात पाचशेवर कविता मुखोद्गत