मागील काही दिवसापासून हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वांच्याच मनात भीती आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत निष्पात कोराेना बाधितांचा मृत्यू झाला. या आगीची धग कायम असतानाच शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वॉर्ड क्रमांक २ मधून धूर निघत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासन वार्डमध्ये दाखल झाले. अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. ही धूर आगीचा आहे की अन्य कशाचा? हे कोणालाच समजत नव्हते. रूग्ण, स्टाफ व सर्वच प्रशासन घाबरले होते. सर्वांच्याच काळजात धडधड होत होते. दोन तास ही धावपळ सुरूच होती. अखेर तज्ज्ञाला बोलावून याची शहानिशा करण्यात आली. त्यांनी हा वास आणि धूर शौचालयात जास्त प्रमाणात टाकलेल्या ॲसिडचा असल्याचे सांगितले. ॲसिड आणि मेडिक्लोर हे दोन्ही एकत्र वापरले त्यामुळे वास आणि धूर निघाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्वांची मोकळा श्वास घेत वॉर्डमधून काढता पाय घेतला. या दोन तासात मात्र, सर्वांचाच जीव टांगणीला पडला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर, मेट्रन संगीता दिंडकर, पोलीस निरीक्षक रवी सानप, साईनाथ ठोंबरे आदी अधिकाऱ्यांनी वॉर्डमध्ये धाव घेतली होती.
फायर ऑडिट नंतर उपाययोजना काय?
भंडारा घटनेनंतर सर्वच शासकीय रूग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले होते. फायर ऑडिटचा अहवालही रूग्णालय प्रशासनाला दिला. परंतु त्यानंतरही काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसत आहे. एखादी घटना घडण्यापूर्वी सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
===Photopath===
240421\24_2_bed_21_24042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात धूर निघाल्याचे समजताच अग्निशमन विभागाची गाडी पाचारण करण्यात आली होती.