शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

बारावी परीक्षेत आतापर्यंत ५९ विद्यार्थी रस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:26 AM

बीड : महाराष्ट राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत गुरुवारी दोन जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. ...

बीड : महाराष्ट राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत गुरुवारी दोन जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ५९ जणांवर अशी कारवाई करण्यात आली. दरम्यान शुक्रवार १ मार्चपासून जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे.

२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. ९५ परीक्षा केंद्रावर ३९ हजार १२२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. २० मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. गुरुवारी एमसीव्हीसी व भारतीय संगीत इतिहास विषयाची परीक्षा झाली. आष्टी येथे पं. जवाहरलाल नेहरु विद्यालय परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालय केंद्रावर शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.बुधवारी ६ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालय केंद्रावर १ तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय केंद्रावर २ तर नाथापूर येथील नाथ कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर ३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. सात दिवसात एकूण ५९ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे निश्चितराज्य परीक्षा मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षांना श्ुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १५२ केंद्र तर १५ परीरक्षक केंद्र आहेत. ४३ हजार ७८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. २२ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू विषयाची परीक्षा होत आहे.बैठकांमुळे परीक्षेवरील नियंत्रण ढासळलेबारावीच्या परीक्षा सुरु होण्याच्या आधीपासून जिल्हा पातळीवरील प्रशासनाच्या विविध विभागांच्या बैठकांमुळे, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स व तपासणी दौऱ्यांमुळे परीक्षा नियंत्रणासाठी नेमलेल्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे कॉपीला आळा घालण्यासाठीचे उपाय तोकडे पडले आहेत. यातच परीक्षा केंद्रांवर नियुक्त बैठे पथकाकडून आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीexamपरीक्षा