नजीकच्या भविष्यात, बीड शहरातील श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेली डोंगरावरील ही भूमी घनदाट जंगलाचा आनंद देणारी व्हावी, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. एक मीटर बाय एक मीटरच्या लाकडी फ्रेममध्ये एक त्रिकोण असून, प्रत्येक टोकाला एक पॉईंट येतो. तेथे झाड लावतात. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे लावतात. वृक्ष, छतवृक्ष, उपवृक्ष आणि झुडूप असे वृक्ष प्रकार एकत्रितपणे या घनवनात लावण्यात आले.
निसर्गासाठी अमोल दातृत्व
रामगडाचे अमोल महाराज धांडे यांनी या प्रकल्पाला आठ गुंठे जमीन, पाण्याची सोय, बीडच्या डॉक्टर महिलांच्या भिशी ग्रुपने झाडांचा खर्च, रोटरी क्लब, बीडने ठिबक सिंचनाची सोय, युथ फॉर नेशन, युथ फॉर फ्युचर, अभाविप, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, शिवराई ग्रुप यांच्यातर्फे श्रमदान, वन विभाग बीड यांचे मार्गदर्शन या विविध लोकांच्या जनचळवळीतून हा प्रकल्प उभा राहिला आहे.