लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील ४० फूट रस्त्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे. सदरील रस्त्याचा प्रश्न परिसरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा आहे. हा रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. गंगासागर नगर, कृष्णा नगर, सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांसाठी बंद असलेला ४० फूट रस्ता अनंत अडचणींना कारणीभूत ठरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. येत्या आठ दिवसात नगरपरिषदेने ४० फूट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर २२ जून रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी नगरसेवक गोपाळ आंधळे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश खाडे, दीपक शिंदे, संतोष चौधरी, कमल नाईकवाडे, रितेश टाक, राजाभाऊ जाधव, राधाकृष्ण टेहरे, जगन्नाथ वडुळकर, दिलीप बुरांडे, वैजनाथ यादव, सुधाकर काळे, श्याम व्यवहारे, नवनाथ आघाव, वाल्मीक आरसुळे, परशुराम मेंगले, संदीप सुकाळे, वैभव लिखे, राजू शिंदे, गंगाधर मेंगले, विष्णू सुकाळे, दत्तात्रय यम्मलवाड, व्यंकटेश बेजगमवार, नागनाथ जाधव, श्याम शिंदे, तुकाराम उदावंत आदी उपस्थित होते.