रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.
वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. मात्र, परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.
गस्त वाढवा
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिवस-रात्र वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी होत आहे.