बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी १२ महसूल मंडळातील जवळपास ४७ हजार शेतकºयांना सोयाबीनचा विमा जाहीर झाला आहे. याची रक्कम दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.बीड जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला होता. यापुर्वीच पहिल्या टप्प्यात २२ मंडळातील जवळपास १ लाख ३१ हजार ६२८ शेतक-यांना २४६ कोटी ३४ लाख ६३ हजार रूपयांचा विमा वाटप झालेला आहे. त्यानंतर आणखी ४१ मंडळातील शेतक-यांना सोयाबीन विम्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी आणखी कवडगाव, वडवणी, म्हाळस जवळा, नाळवंडी, पेंडगाव, पिंपळनेर, राजुरी, दिंद्रुड, नित्रूड, धारूर, मोहखेड आणि तेलगाव या १२ मंडळातील जवळपास ४७ हजार शेतक-यांना विमा जाहीर झाला आहे.यामध्ये मोहखेड मंडळातील शेतकºयांना पैसे जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राहिलेल्या मंडळातील शेतकºयांच्या खात्यावर दोन दिवसांत पैसे जमा होतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले.शेतक-यांना कित्येक महिन्यांपासून सोयाबीनच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. ४७ हजार शेतकºयांना दोन दिवसांत विमा शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
१२ मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:34 AM