बीड : महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राबविणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ही मोहीम राबविण्यासाठी येथील स्काऊट भवनच्या सभागृहात बुधवारी जिल्हयातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षकांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अमोल येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी व गुणवत्तावत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून नियोजनबध्द उपक्रम राबवावेत. प्रवेशप्रात्र सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के शाळा प्रवेश द्यावेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर द्यावा. प्रशिक्षण पायाभूत शिक्षण, गुणवत्ता या उपक्रमामध्ये काम करण्यास शिक्षकांना मर्यादा नसल्याचे सांगून इच्छाशक्ती आणि कर्तव्य भावनेतून कार्य केल्यास उपक्र म यशस्वी होईल, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करावे. आपल्या अवतीभवतीच्या गुणवत्तापूर्ण शाळांचा आदर्श घेऊन तसे उपक्रम सुरु करावेत. चौदाव्या वित्त आयोगातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांच्या सहकार्याने विविध १५-२० नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून जिल्हा परिषद शाळांची नवीन ओळख निर्माण करून,पालकांनाही त्यांच्या पाल्यांना जि. प. च्या गुणवत्ता पूर्ण शाळेत पाठविण्यास प्रेरित करण्याचे आवाहन सीईओंनी केले.यावेळी उपक्र मशिल शिक्षकांनी राबविलेल्या उपक्र माविषयी आणि विविध अडचणींबाबत सीईओंनी संवाद साधला. यावेळी विस्तार अधिकारी प्रविण काळम, सोमनाथ वाळके, संतोष दाणी, आश्रुबा सोनवणे, बा.म.पवार, अशोक निकाळजे, जया इगे, राजश्री अंडील आदींनी विविध उपक्रम राबविण्यासाठी आपले विचार मांडले.याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी वाढविण्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी, विविध उपक्रमांसह प्रश्न मंजूषा सारखे कार्यक्र म राबविण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांनी आगामी शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्र माविषयी माहिती दिली.यावेळी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.ग्रामीण भागात इंग्रजी शाळांबद्दलचे आकर्षण अनेक पालकांमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुभवी शिक्षक आहेत, शासनाच्या योजना राबवल्या जातात तसेच पर्यवेक्षण केले जाते. त्यामुळे त्या भागातील इंग्रजी शाळांच्या तुलनेत जि. प. च्या शाळा सक्षम कशा आहेत, शिक्षण कसे दर्जेदार आहे हे पटवून देत जि. प. च्या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न करणार आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे म्हणाले.
गुणवत्तेसह प्रवेशवाढीसाठी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:32 PM
महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राबविणार आहे.
ठळक मुद्देमहिनाभर प्रवेशोत्सव : बीड जि. प. च्या शाळांचा दर्जा पटवून सेमी इंग्रजीचे शिक्षण देणार, इंग्रजी शाळांच्या आकर्षणाची झूल हटविणार