शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आ. भीमसेन धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
आष्टी : आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा येथे ‘लोकमत- रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक, राजकीय नेते, तरुणांनी व आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाने या शिबिरास सहकार्य केले. मान्यवरांनी या शिबिरास दिवसभर भेटी दिल्या व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
अहमदनगर येथील जीवनराज चॅरिटेबल फाउंडेशन ब्लड बँकेच्या रक्तपेढीस शुक्रवारी दात्यांनी रक्तदान केले. येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम व रक्तपेढीचे डॉ. राजेंद्र पवार, शिवम खिलारे, सुप्रिया कपिले, प्रतीक्षा धावटे यांनी दिवसभर परिश्रम घेतले.
आष्टी येथे ‘लोकमत’च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे सदस्य, बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व तालुक्यातील व शहरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून ‘लोकमत’च्या महायज्ञ शिबिरास उत्साहाने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, प्राचार्य सोपान निंबोरे, आदी उपस्थित होते.
शिबिरास मान्यवरांच्या भेटी
उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश शिंदे, पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, युवा नेते सागर धस, महेश आजबे, अमोल तरटे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मेहेर, शिवसेना तालुकाप्रमुख कुमार शेळके, भाजप तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाऊ घुले, पंचायत समितीचे सदस्य आजिनाथ सानप, संभाजी पोकळे, कैलास दरेकर, ह.भ.प निळकंठ तावरे महाराज, उपप्राचार्य अविनाश कंदले, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, प्रा. बबन उकले , डॉ. सुनील गदादे, राजेंद्र लाड, डॉ. सुनील पारखे, आनंद देवा जोशी, शिवाजी वाल्हेकर, कुमार शेळके, बाबासाहेब गायकवाड, संतोष वनगुजरे, सुरेश भिसे, राजेंद्र जरांगे, लक्ष्मण तोडकर, मोसिन कुरेशी, विशाल गोरे, जयचंद नेलावाडे, दीपक गरुड, अफसर पठाण, दीपक उडाळे यांनी शिबिरास भेट दिल्या. ओम स्टील परिवारातर्फे प्रशांत वाघमारे ,विशाल जाधवर, अक्तार सुबानी यांचे योगदान लाभले.
पत्रकार भीमराव गुरव, अविशांत कुमकर, निसार शेख, गणेश दळवी, प्रवीण पोकळे, सचिन रानडे, शरद तळेकर, मुज्जाहिद सय्यद, जावेद पठाण, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, नितीन कांबळे, संदीप जाधव, अनिल मोरे, शहानवाज पठाण, अण्णासाहेब साबळे, किशोर निकाळजे, जावेद शेख आदी उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’च्या सामाजिक कार्याचे सर्वांनी कौतुक केले.
कोरोना महामारीमध्ये ‘लोकमत’ने राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासल्याने ‘लोकमत- रक्ताचे नाते’ महायज्ञ शिबिराचे आयोजन केल्याने गरजू रुग्णांचे प्राण वाचतील व मोठ्या प्रमाणावर रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल. लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांनी परिश्रम घेऊन शिबिर आयोजन केल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
- भीमसेन धोंडे,
माजी आमदार, आष्टी
090721\img-20210709-wa0310_14.jpg