सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने शिवजयंती
धारूर : येथील सकल मराठा समाज सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मोठ्या संख्येने दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवभक्तांसाठी शिवप्रसादाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जगताप व ग्रामसेवक बालासाहेब झांबडे यांचा श्री भगवत गीता ग्रंथ गौरव करण्यात आला. त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले. नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, सकल मराठा समाजाचे अतुल शिनगारे, रामेश्वर खामकर, अनंता भोसले, ईश्वर खामकर, नितीन शिनगारे, ॲड. परमेश्वर शिनगारे, सुरेश फावडे, ॲड. मोहन भोसले. नगरसेवक संजित कोमटवार, बाळासाहेब खामकर, विनायक शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार, शोएब पठान आदी उपस्थित होते.