बीड : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संस्थेचे संचालक जुगलकिशोर जैन, संतोजी पारगावकर, मंगेश हंसे, आर्ट ऑफ लिव्हिंग समन्वयक दिलीप कुलकर्णी व सुधाकर कुलकर्णी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा शुभारंभ झाला.
सातत्याने रक्तदान करणारे अनिल काटकर, दत्तात्रय गोरवडकर, अभय आणि अस्मिता पटवारी, शंकर आणि आरती पिंगळे, प्राचार्य प्रशांत पवळ, कृष्णा कुलकर्णी आणि सर्वात लहान वयाची म्हणजे ज्ञानेश्वरी कुलकर्णी यांनीही यावेळी रक्तदान केले. यावेळी लोकमत पार्टनर श्री स्टीलचे प्रशांत वाघमारे, विशाल जाधवर, ट्रीपतर्फे शेख ताहेर उपस्थित होते. डॉ.अंजली नाईकवाडे, अनिल बिराजदार, वैभव गोरमाळी, अशोक नवले, महेश शेजाळ, पूनम जव्हेरी, आंचल धोंगडे, समीक्षा वायकोस आणि बीड ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
बीड येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, पिंपरगव्हाण रोड, येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा समन्वयक दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक सचिन पिंगळे, मयुरेश गावरस्कर, योगेश नाईकनवरे, मारुती शिंदे, प्रणिता कुलकर्णी, अनिता एरंडे, विश्वनाथ गडकर, साधक प्रज्ञा गायकवाड, सारिका उगले, शर्मिला काळे, पवन झंवर, प्रेरक वैद्य, नीलेश मस्के, सचिन चंदनशिव, संतोष सावंत, संतोष पारगावकर, मंगेश हंसे, जुगलकिशोर जैन आणि श्री श्री रविशंकर विद्यामंदिरच्या प्राचार्य अनिता सूर्यवंशी, सुरेखा धांडे व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
150721\15bed_14_15072021_14.jpg
शिबीर