बीड : कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून बेलूरा (ता.बीड) येथे पंचायत समिती सभापती सारिका बळीराम गवते यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन ८ जुलै रोजी केले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बेलूरा येथे गावात अनेकदा कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. सध्याही काही रूग्णांवर उपचार सुरू असून गावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. गुरूवारी सकाळी बळीराम गवते यांच्या हस्ते बेलूरा येथील आरोग्य केंद्रात शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पहिली लस बाबा भवर यांना देण्यात आली. गावातील १८ वर्षावरील जवळपास १०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. दरम्यान ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. विकास गावडे, गोविंद गवते, राजेश केदार, पांडुरंग गवते, सचिन भवर, अंकुश गवते, दत्ता लाटे, तात्यासाहेब गवते, विष्णू लाटे, नानाभाऊ लाटे आदींची उपस्थिती होती.
कोरोनाच्या बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावागावत असे कॅम्प भरवणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचासह लोकप्रतिनिधींनी देखील ग्रामस्थांना लस घेण्यासंदर्भात जागृत करावे. लस घेण्यासाठी आवश्यक ती मदत करावी.
- सारिका बळीराम गवते, सभापती, पं.स. बीड
080721\08_2_bed_13_08072021_14.jpg
लसीकरत केंद्रावर लस घेताना ग्रामस्थ