शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

पगार कमी असलेतरी एसटीचे चालक, वाहक समाधानी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:39 AM

अंबाजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर प्रपंच चालवतात. त्यामुळे पगार कमी असले ...

अंबाजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर प्रपंच चालवतात. त्यामुळे पगार कमी असले तरी समाधानकारक जीवन जगतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एस. बी. सय्यद यांनी केले.

अंबाजोगाई आगारातील पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. या वेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, सहायक वाहतूक अधीक्षक अमर राऊत, वाहतूक निरीक्षक पल्लेवड, लेखाकार ओमकार कुलकर्णी, करपे, बाळासाहेब फड, बाबुलाल शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सय्यद म्हणाले, एसटी महामंडळातील कर्मचारी सेवाभावी वृत्तीने कमी पगारावर जनतेला सेवा देत आहेत. दुसरीकडे काम कमी आणि पगार जास्त आहे तेथे सेवाभाव नाही. परंतु एसटी महामंडळामुळे राज्यातील गरीब जनतेला कमी पैशात जास्त प्रवास ही सुविधा मिळते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांच्या पगार वाढीसाठी नेत्यांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. या वेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, करपे यांनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व उपायांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी सेवानिवृत्त वाहक राजकुमार (मुन्ना) लखेरा, चालक ज्ञानोबा पौळ, चालक हनुमंत पवार, चालक अंकुश वाकडे, सहायक दिलीप शेवाळे आदींचा सहपरिवार फेटा बांधून तसेच शाल, श्रीफळ, ड्रेस, साडीचोळी देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. या वेळी आगारातील कर्मचारी, वाहक, चालक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय काळम यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब फड यांनी मानले.

030921\03bed_1_03092021_14.jpeg

एस.टी . कर्मचारी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार