शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

एसटी तुडुंब, ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:52 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नुकतीच दिवाळी झाल्याने आता आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी लगबग सुरु झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून मागील आठ दिवसांपासून लूट सुरु आहे.राज्य परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीच्या तोंडावरच प्रवासी भाड्यात दहा टक्के वाढ केली. तर सणानिमित्त बीड विभागातील सर्व आगारातून किमान ५ व जास्तीत जास्त ७ बसेस मुंबई, पुणे मार्गावर सोडल्या. त्याचबरोबर औरंगाबाद मार्गावरही जादा बसेसच्या फेऱ्या सुरु ठेवल्या. बीड यथून सोलापूरसाठी शिवशाहीच्या चार बसेस सुरु करण्यात आल्या. मुंबई, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, हैदराबादसाठी जवळपास ३७ शिवशाही बस सुरु आहेत. दिवाळी सुटीत येणा-या विद्यार्थी व नोकरदारांची संख्या पाहता आरक्षणाची सुविधा केली. बीड येथून जाणा-या बसेसचे आरक्षण पुर्ण फुल झाले आहे. गर्दी वाढतच असल्याने व पर्यायी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळले आहे. ही गर्दी वाढल्याने ट्रॅव्हल्सचालकांनी संधी साधत सुरुवातीला दुप्पट तर सध्या तिप्पट दर आकारणे सुरु केले आहे. बीड येथून जवळपास २० खाजगी ट्रॅव्हल्स चालक प्रवासी वाहतूक करतात. बीड ते पुणेसाठी एरव्ही ३०० ते ४०० रुपये भाडे होते. ते सध्या ६०० ते ७०० रुपये आकारले जात आहे. तर मुंबईसाठी प्रती प्रवासी भाडे १६०० ते १७०० रुपये आकारले जात आहे. त्याचबरोबर एकूण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्याचे कामही होत आहे. सोमवारपासून आठवड्याचे कार्यालयीन कामकाज तसेच शैक्षणिक वर्ग, परीक्षेची तयारी यामुळे शनिवार आणि रविवारी जाणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. रविवारसाठी तर शनिवारपेक्षा शंभर रुपये तिकिटामागे जादा आकरले जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळtourismपर्यटन