तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंप चालकाला लुटून पाच लाखांची रक्कम पळवली होती. त्यानंतर जिल्हा बँकेच्या कृषी विभागाच्या काचा फोडून चोरीचा प्रयत्न झाला, तर शेजारील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली होती. तसेच काल शनिवार रोजी बायपासजवळ तीन घरे फोडून दोन जणांना मारहाण केली व ८६ हजाराचा माल लंपास केला होता.
या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शहरात ताकडगाव रोड, कोल्हेर रोड या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरीच्या घडलेल्या घटनांत अद्याप तरी चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन चोरट्यांपुढे हतबल बनले आहे. आपणच आपल्या कुटुंबाचे चोरांपासून रक्षण करावे, या हेतूने पर्याय म्हणून शहरातील कोल्हेर रोडवरील शिवाजीनगर भागातील युवकांनी एकत्रित येऊन आळीपाळीने रात्रीची गस्त सुरू करून खडा पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात रोज १५ ते २० युवक पहारा देत आहेत.
180721\sakharam shinde_img-20210718-wa0015_14.jpg