लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने पोषण आहार पंधरवड्याला प्रारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्री मस्के, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात, प्राचार्य डॉ. सविता शेटे, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, सर्व बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. च्या अध्यक्ष सविता गोल्हार होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी महिला सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. माझी कन्या भाग्यश्रीसाठी सर्व लाभार्थींच्या गृह भेटी घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत त्यांनी सूचना केली. २२ मार्चपर्यंत चालणाऱ्या पोषण पंधरवड्यात सर्व विभागांनी किशोरीबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. किशोरींचे शिक्षण, आरोग्य, आहार या विषयांवर कार्यक्रमांतून जनजागृती करावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी बाल विवाह प्रतिबंध, पोषण अभियान, मुलींचा वाढता जन्मदर याबाबत विचार मांडले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी गावपातळीवर अंगणवाडी सेविकांच्या उत्कृष्ट कार्यामुळे कुपोषण निर्मुलनाचे काम प्रभावीपणे झाल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी स्त्री भ्रूण हत्या, महिलांचे आरोग्य, शिक्षकांचे महत्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात यांनी स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाच्या कार्यात महिला व बालकल्याण विभाग व आशा कार्यकर्तींच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात पोषण पंधरवड्यासंबंधी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. पोषण पंधरवड्यात राबवावयाच्या उपक्रमांची तसेच किशोरींना मार्गदर्शनाबाबत या पुस्तिकेत आहे. जिल्ह्यात पोषण पंधरवडा प्रभावी जनजागृतीने यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बीड जिल्ह्यात पोषण पंधरवडा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:59 PM