- सोमनाथ खताळ बीड : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा आणि सेवा ‘आजारी’ पडली आहे. एकूण ५४,२६३ पैकी १५,३९४ पदे रिक्त असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये वर्ग १ च्या १६५६ पैकी १०८७ पदांचाही समावेश आहे. एकूण रिक्त पदांचा आढावा घेतला असता तब्बल २८ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली. यावरून सद्यस्थितीत राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ‘प्रभारीराज’ असल्याचे स्पष्ट होते.
आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक आणि अतिरिक्त अभियान संचालक हे दोनच पदे भरलेले आहेत. त्यानंतरच्या पदाला ग्रहन लागलेले आहे. आरोग्य सेवा संचालक, अतिरिक्त आरोग्य सेवा संचालक, समुह संचालक, उपसंचालक यांची ४१ पैकी केवळ २० पदे भरलेली आहेत. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्पेशालिस्ट केडर अशा १५९२ पैकी १०४४ जागा रिक्त आहेत. याची टक्केवारी ६६ टक्के एवढी आहे. वैद्कीय अधिकाऱ्यांचीही ८८१६ पैकी १६४६ पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडे संघटना व संबंधितांनी वारंवार मागणी केली. मात्र, शासनाने अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडत चालली आहे. रिक्त जागांमुळे कामकाज सुलभ आणि सनियंत्रण करण्यासाठी तसेच शासानाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी संघटनांसह सर्वसामान्यांमधून होत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्याशी भ्रमणध्वणीवरून वारंवार संपर्क केला, मात्र त्यांनी न घेतल्याने बाजू समजली नाही.
तज्ज्ञांची ६२७ पैकी ४८० पदे रिक्तआरोग्य विभागात २१ प्रकारची ६२७ पदे स्पेशालिस्टची आहेत. पैकी केवळ १४७ भरलेली असून ४८० पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी (एचटीटी) २६ पैकी २३ रिक्त आहेत. तसेच बालरोग तज्ज्ञ ४९ पैकी ३८, स्त्रीरोग तज्ज्ञ ४५ पैकी ३७, भुलतज्ज्ञ ५९ पैकी ३७, नेत्रतज्ज्ञ ३९ पैकी २८, अस्थीरोग तज्ज्ञ ३३ पैकी १८, कान-नाक-घसा तज्ज्ञ ३१ पैकी २०, रेडिओलॉजिस्ट ४० पैकी २५, मानसोपचारातज्ज्ञ ९० पैकी ७९, पॅथॉलॉजिस्ट ३२ पैकी २२, चेस्ट अँड टीबी ३० पैकी २८, त्वचाविकार तज्ज्ञ ३० पैकी २२, अधीक्षक महिला रुग्णालय २० पैकी १०, अधीक्षक दमा रुग्णालय ३ पैकी ०, अधीक्षक मनोरुग्णालय ४ पैकी २, उप अधीक्षक मनोरुग्णालय ४ पैकी ३, पोलीस सर्जन १ पैकी ०, चीफ एमओ दमा नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र २ पैकी ०, दंत तज्ज्ञ २६ पैकी २५, विशेष रुग्णालय ५१ पैकी ५०, हायर ग्रेड स्पेशालिस्ट १२ पैकी १२ अशी पदे रिक्त आहेत.
अपुरे मनुष्यबळ असल्याने विविध अडचणी येत आहेत. पदे भरण्यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे मागणी केलेली आहे. मंगळवारी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा निवेदन दिले आहे. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तारीख व वेळ मागितली आहे.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड तथा अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना, महाराष्ट्र राज्य
अशी आहेत राज्यातील पदे रिक्त (आकडेवारी)पदे मंजूर रिक्त टक्केआरोग्य सेवा (वर्ग १) १६५६ १०८७ ६६आरोग्य सेवा (वर्ग २) ७७८९ १६३९ २१आरोग्य सेवा (बीएएमएस) १०२७ ०७ ०१सामान्य राज्य सेवा अ-ब ९३५ ६५८ ७०ग्रेड सी ३०२८९ ८०२९ २७ग्रेड डी १२५६७ ३८७४ ३१एकूण ५४२६३ १५२९४ २८