अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे.बीड येथील आडत बाजारात उडीद आणि मुगाची रोज प्रत्येकी १०० क्विंटल आवक होत आहे. उडदाला ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. तर मुगाला ४ हजार ५०० ते ५४०० रुपये भाव आहे. बाजरीचीही साधारण आवक असून उत्तम प्रतीच्या बाजरीला १६०० रुपये प्रती क्विंटल तर हलक्या प्रतीला १२०० रुपये भाव आहे.मागील हंगामात शासनाने हरभºयाला ४ हजार ४०० रुपये हमीभाव दिला होता. तसेच उत्पादनही बंपर झाले होते. नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. दुसरीकडे बाजारात हमीदरापेक्षा जादा दराने ५ हजार २०० रुपयांपर्यंत व्यापाºयांनी हरभरा खरेदी केला होता. भविष्यात तेजीच्या आशेने काही व्यापाºयांनी खरेदी केलेल्या हरभरा स्टॉक केला होता. परंतु, मागील तीन महिन्यात बाजारात हरभºयाच्या दरात घसरण होत राहिली. सध्या ३ हजार २०० रुपये क्विंटल भाव आहे. त्यामुळे जादा दराने खरेदी केलेल्या व्यापाºयांना बाजारदरानुसार प्रतिक्विंटल एक हजार ते १५०० रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे हरभरा विक्री करण्यास स्टॉकिस्ट व्यापारी धजावत नसल्याचे दिसते.बफर स्टॉक करणाºया व्यापाºयांना गुंतवणुकीवरील व्याज, गोदाम भाडे परवडेनासे झाले आहे. तसेच हरभºयाचा दर्जा घसरण्याची भीती सतावत आहे. सध्या बाजारत घसरलेले दर पाहता हरभरा व्यापाºयांना त्यात मुद्दलात नुकसानीची वेळ आली आहे.घ्यायला गेलं तर मिळत नाही, मिळालं तर विकत नाहीयंदा कमी पावसामुळे उत्पादकता घटणार आहे. तसेच मंदीचे वारे असल्याने तसेच शेतकरी व व्यापाºयांकडे स्टॉक नसल्याने आडत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. यंदा कापसाचे ५० टक्के तर सोयाबीनचे ६० टक्के उत्पादन हाती लागेल असा अंदाज आहे.खरेदी करावे तर बाजारात माल नाही, मिळाले तर पुढे चांगला भाव नाही, आणि विकत नाही अशी स्थिती असल्याचे बीड येथील आडत व्यापारी विष्णूदास बियाणी यांनी सांगितले. तर पाऊस नसल्याने परळीच्या बाजारपेठेत मूग वगळता इतर सर्व मालाची आवक नसल्यासारखी आहे. नविन सोयाबीनला अजून दोन आठवडे अवकाश असल्याचे आडत व्यापारी महावीर कोटेचा यांनी सांगितले.
हरभरा घसरल्याने स्टॉकिस्ट व्यापाऱ्यांचा आतबट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:30 AM
आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे.
ठळक मुद्देपावसाअभावी आडत बाजारात आवक मंदावली; मुगाची साधारण आवक