राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परळी धर्मापुरी रोडवर गस्त घालताना एका संशयित कारमधून बनावट देशी दारुच्या ३ पेट्या जप्त केल्याची कारवाई २२ डिसेंबर रोजी
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता लागू असून नाताळ व नववर्षाच्या सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार विभागाकडून अवैध दारु धंद्यांवर धाडसत्र राबविण्यात येत आहे. अशाच एका मोहिमेत अंबाजोगाई व बीडचे भरारी पथक परळी-धर्मापुरी रोडवर २२ डिसेंबर रोजी सायंकाळी गस्त घालत होते. त्यांना एक कार जिचा नंबर एमएच. २२-एच-८५० दिसली. संशय आल्याने या पाठलाग केला असता चालक कार परळी तालुक्यातील वैजवाडी शिवारात कडेला लावूनपसार झाला. या कारची झडती घेतली असता त्यात देशी दारुच्या ३ पेट्या आढळून आल्या. तसेच वाहनामध्ये देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या भरलेले सात पोते आढळून आले. सदरचा देशी दारु साठा व रिकाम्या बाटल्या बनावट मद्य तयार करुन विक्री करण्याच्या उद्देशाने फरार आरोपी घेऊन जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आल्याने कार व मुद्देमाल ताब्यात घेऊन फरार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारमधून देशी दारु १८० मिली क्षमतेच्या १४४ बाटल्या, ११०० रिकाम्या बाटल्या जप्त केल्या असून त्याची किंमत ९ हजार ६८८ इतकी असून कारच्या किंमतीसह २ लाख ४४ हजार ८८ इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबाजोगाईचे दुय्यम निरिक्षक एस.आर.आल्हाट, बीडच्या भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक आर.ए.घोरपडे,जवान धस व सादेक अहमद यांनी केली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.