बीड : जिल्ह्यात दुचाकी व इतर वाहन चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी वाहन चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार पथकाला मिळालेल्या माहितीवरून २ जानेवारी रोजी गेवराई तालुक्यातील राजापूर येथून नितीन अंकुश सोनवणे यास चोरीचे ट्रॅक्टर व दुचाकी वापरताना अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली व विचारपूस केली असता, त्यांना मिळालेली माहिती खरी निघाली. याप्रकरणी सोनवणे याला अटक केली आहे. त्याच्याकडून ट्रॅक्टर व दुचाकी असा १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. विजय गोसावी, पोना. विकास नाईक, प्रसाद कदम, राहुल शिंदे, अशोक दुबाले, अतुल हराळे यांनी केली.