बीड : गेल्या चार वषार्पासून शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढावलेले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकºयांनी भरलेला पीकविमा शासनाच्या व विमा कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अजून मिळालेला नाही. तात्काळ पीकविम्याची रक्कम शेतक-यांना अदा करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही काळ कार्यालयासमोर रास्ता रोको देखील करण्यात आला होता.बीडमध्येराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी शेतक-यांना पीकविम्याचे पैसे तात्काळ मिळाले पाहिजेत, ही मागणी शासनाकडे केली. ही भूमिका घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आणि धरणे आंदोलन केले. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या कानी टाकल्या. पीकविमा कंपन्या शेतक-यांच्या जिवाशी खेळत आहेत. तात्काळ शेतकºयांना पीकविम्याचे पैसे देण्यात यावेत अन्यथा शासनास आणि पीकविमा कंपनीस गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला. यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
पीकविम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:53 PM
पीकविम्याची रक्कम शेतक-यांना अदा करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन