बीड : खायला भेटते म्हणून तिखट, मसालेदार पदार्थ आपण खात असतो. परंतु ते आरोग्यासाठीही घातक ठरू पाहत आहेत. असे पदार्थ खाल्ल्याने पोटाचा अल्सर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे याचा सर्वांत जास्त धोका हा कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आहे. कारण त्यांना स्टेरॉइडचा अधिक मारा केलेला असतो. वैद्यकीय तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला वारंवार वैद्यकीय तज्ज्ञ देत असतात. परंतु तरीही काही लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. व्यायाम न केल्याने, जास्त आहार झाल्याने, कमी आहार झाल्याने विविध आजार होतात. तसेच मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यानंतरही पोटाचा अल्सर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जिभेला आवर घालत असे पदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
--
काय काळजी घ्यावी
पोटाचा अल्सर टाळण्यासाठी मऊ व थंड पदार्थ जास्त खावेत. तसेच जास्त वेळ जागरण करू नये, पेन किलर गोळ्या खाणे बंद करावे, मद्यपान करू नये, ताण घेऊ नये. थोडाही त्रास जाणवायला सुरुवात झाली की जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा अथवा तपासणी करावी.
--
काय आहेत लक्षणे
पोट दुखणे.
उलट्या होणे.
भूक मंदावणे.
वजनात अचानक घट होणे.
पित्त होणे.
काळी संडास होणे.
--
अल्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटाचा अल्सर होण्याची दाट शक्यता असते. कोरोनामुक्त लोकांना याचा धोका जास्त असतो. कारण उपचारादरम्याना त्यांना स्टेरॉइड दिलेले असते. थंड व मऊ पदार्थ खाण्यास जास्त प्राधान्य द्यावे. थोडेही लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. विशाल कोटेचा, वैद्यकीय तज्ज्ञ, बीड
020921\02_2_bed_20_02092021_14.jpeg
डॉ.विशाल कोटेचा