शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

अंबाजोगाईत रास्ता रोको; प्रकृती खालावलेले अनेक उपोषणार्थी इस्पितळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:14 PM

जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व.डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. मुंदडा यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या समर्थकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अंबाजोगाई : जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व.डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. मुंदडा यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या समर्थकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

येथील यशवंतराव चव्हाण चौकात मुंदडा समर्थकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे व समस्यांचे गांभीर्य प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याने समर्थकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तीन तास ठप्प होती.

केज मतदार संघातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अनेक निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे जनतेचे बेहाल होत आहेत. यासाठी डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचाच्या वतीने २७ जानेवारीपासून नंदकिशोर मुंदडा हे समर्थकांसह उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. परंतु प्रशासनाकडून या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी महारास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे अंबाजोगाई शहरातील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. रास्तारोको आंदोलनानंतर सर्व कार्यकर्ते उपोषणाच्या समर्थनार्थ उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.

रास्ता रोको आंदोलनात अक्षय मुंदडा, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, नगरसेवक शेख रहीम, संतोष शिनगारे, खलील मौलाना, शेख ताहेर, बालाजी पाथरकर, नेताजी शिंदे, अ‍ॅड. संतोष लोमटे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, गंगाधर ढोणे, राजेश व्हावळे, अजित सांगळे, वैजनाथ देशमुख, संतोष जिरे, बापू व्हावळे, योगेश कडबाने, बाबासाहेब शेळके, विशाल मुंदडा, अनंत आरसुडे, बळीराम चोपणे, बबलु सिद्दीकी, शेख जावेद, शेख तय्यब, दिग्विजय लोमटे, गौरव लामतुरे, मोमीन जरगर, गजेंद्र जाधव यांच्यासह विचारमंचचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

उपोषणाचा पाचवा दिवससलग पाचव्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच असून नंदकिशोर मुंदडा यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाच्या वतीने उपोषणाच्या संदर्भात व जनतेच्या न्याय मागण्यांबाबत उदासीनता जाणवू लागली आहे. या समस्यांबाबत गांभीर्याने ठोस उपाययोजना होत नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या मागण्यांसाठी सुरू आहे उपोषणलोखंडी सावरगाव परिसरातील तयार इमारतीत तातडीने जेनेटिक आणि वंध्यत्व निवारण रुग्णालय सुरु करावे, याठिकाणी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु करावे, याच परिसरात आरटीओ कार्यालय बांधण्यात यावे आणि संपूर्ण परिसराला स्व. विमलताई मुंदडा यांचे नाव देण्यात यावे, महाबीजचे कार्यालय शहरात आणावे, महावितरण कार्यालयासमोरील उपोषणाच्या वेळी लिखित स्वरूप दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, केज तालुक्यातील पाथरा आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या दोन्ही ठिकाणी १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात यावे तसेच सोमनाथ बोरगाव, डिघोळअंबा, उंदरी, वाघेबाभळगाव या ठिकाणी ३३ के.व्ही. उपकेंद्र सुरु करण्यात यावे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री आणि औषधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.