शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कोळगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:26 AM

तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे,

ठळक मुद्देनिमगाव (मायंबा) प्रकल्प, कोळगाव ३३ केव्ही वीजकेंद्र, चारा छावण्या सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात यासह आदी मागण्यासाठी शुक्रवारी तालुक्यातील कोळगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.तालुक्यातील कोळगाव येथे ३३ केव्ही वीजकेंद्र मंजूर आहे. मात्र या वीजकेंद्राचे काम अद्यापही सुरु झाले नसून, यामुळे शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय पातळीवर या वीज केंद्राचे काम सुरु होण्यास विलंब होत आहे. तरी या वीज केंद्राचे काम तात्काळ करण्यात यावे तसेच शिरुर तालुक्यातील निमगाव (मायंबा) हा प्रकल्प दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा असून या प्रकल्पाचे काम करण्यात यावे हा प्रकल्प झाल्यास गेवराई तालुक्यातील चकलांबा, मादळमोही, पाचेगाव, सिरसदेवी व जातेगाव या जि.प. सर्कलचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. तसेच गेवराईसह शिरुर व बीड या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. मात्र प्रकल्पाला राजकीय उदासीनता असल्याने हा प्रकल्प रेंगाळल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. भीषण दुष्काळ असल्यामुळे शासनाने चारा छावण्या तात्काळ चालू कराव्यात, या मागण्यांसाठी कोळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.दरम्यान, आंदोलनस्थळी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात अ‍ॅड. उध्दव रासकर, रासपा जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, मनसे तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, तुकाराम तळतकर, अनिरूध्द लोंढे, जयदत्त बनसोडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagitationआंदोलन