अवैध वाळू उपसा बंद करावा या मागणीसाठी पेंटर विष्णू रोडगे, भागवत काकडे, बळीराम काकडे, बाळू पवार
मधुकर खामकर ,सखाराम काकडे यांनी उपोषण सुरू केले. परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, भाजपा किसान मोर्चाचे सदस्य उत्तम माने, भगवानराजे कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ताबडतोब वाळू उपसा बंद करण्यात आला. या परिसरात १५ जूनपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अवैध वाळू उपसा केलेल्या खड्ड्याचे पंचनामे करून संबंधित वाळू चोरांवर कारवाई करणार, दक्षता समिती स्थापन करणार व वाळू चोरीच्या तक्रारी तत्काळ निकाली काढणार असे लेखी पत्र नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले.
फोटो : परळी तालुक्यातील पोहनेर येथे ग्रामस्थांनी सोमवारी उपोषण केल्यानंतर तहसील व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले.
===Photopath===
130421\img-20210412-wa0475_14.jpg