बीड : जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जून महिन्यात अल्प पावसावर कापूस लागवड झाली होती. पीक उगवल्यानंतर काही दिवसात पानांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचे लक्षात आले. बोंडअळी तयार होण्यासाठी आवश्यक पतंग कामगंध सापळ््यात अडकतात. त्यामुळे बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. बोंडअळीमुळे गत वर्षातील उत्पादनातील घट पाहता कृषी विभागाने जिल्हाभरात जनजागृती व उपाययोजना मोहीम राबवली आहे.हे आहेत उपायकापसावरील गुलाबी बोंडअळी प्रादूर्भाव रोखण्यासठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. त्यानंतर सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रति सापळा सापडले आढळले तर नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५, डब्ल्यू पी १२ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याचे आत्माचे बी. एम. गायकवाड म्हणाले.जिनिंग मालकांवर होऊ शकते कारवाईबोंडअळी रोखण्यासाठी राबवण्यात येणाºया मोहिमध्ये जिनिंग मालकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश बैठक घेऊन सर्वांना जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच जिनिंग परिसरात कामगंध सापळे लावत बोंडअळी नियंत्रण देखील करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी न होणाºया जिनिंग मालकांवर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत.
सरपंचांना कृषी आयुक्तांचे आवाहनबोंडअळी निर्मुलन मोहिमेत गावातील सरपंचांनी देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी आयुक्तांनी पत्राद्वारे केले आहे. तसेच शेतमध्ये कामगंध सापळे बसवण्यासाठी गावातील शेतकºयांना प्रवृत्त करावे जेणेकरून बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यात यश येईल व होणारे नुकसान टळता येईल.पावसाने ओढ दिल्यामुळे पिके सुकण्याची भिती आहे. या काळात किडीचा हल्ला देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेट ५० गॅ्रम १० लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.