बीड शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होता. याच धरणावील विद्यूत मोटारीला तेलगाव येथून वीज पुरवठा होतो. परंतु गुरूवारी रात्री झालेल्या पावसाने टालेवाडी ते शिंदेवाडी दरम्यान बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच दुरूस्तीचे काम हाती घेतले. दुपारी साडे चार वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. त्यांच्याकडून दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे अभियंता थावरे यांनी सांगितले.
दरम्यान, वीज खंडीत असल्याने मोटारी बंद आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. मोटार सुरू झाल्यानंतर २४ तासांनी बीड शहराला पाणी मिळणार आहे. सध्या तरी एक ते दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत आपण महावितरणच्या संपर्कात असून लवकर वीज जोडणी करण्यास सांगितल्याचे पालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके व पीआर दुधाळ यांनी सांगितले.