लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात अपवादात्मक रस्ते वगळता सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. सध्या हाडावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये मणक्याचे आजार जडलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात प्रत्येक वर्षी रस्ते दुरुस्तीवर करोडोंचा खर्च केला जातो. मात्र, काम निकृष्ट होत असल्याने अवघ्या काही दिवसात खड्डे जैसे थे दिसून येतात. बीड शहरात गल्लीबोळ ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा खड्डा चुकविताना अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दुचाकीस्वारांनासर्वाधिक त्रास२० ते ३५ वयोगटादरम्यानची व्यक्ती दुचाकीवरुन सर्वाधिक प्रवास करते. त्यामुळे याच वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक मणक्याचे आजार जडल्याचे सांगण्यात आले. बस व इतर वाहनांमध्ये प्रवास करणाºयांना हा आजार कमी असल्याचे समजते.दर्जेदार कामाची अपेक्षाप्रत्येक वर्षी खड्डे बुजवून करोडो रुपये ठेकेदारांच्या घशात घातले जातात. प्रशासनाचेही याला सहकार्य असते. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करुन हे खड्डे दर्जेदार बुजवावेत व रस्ता वाहतुकीसाठी चांगला बनवावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्यांची चाळणी; खड्ड्यांमुळे बीडकरांचे ‘मणके’ खिळखिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:28 AM