: विनाकारण फिराल तर दंडात्मक कारवाई
केज : वाढत्या संसर्गामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाही, केज शहरात नागरिकांचा मुक्तपणे संचार चालू आहे. त्यामुळे शनिवारी उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केज येथे येऊन रस्त्यावर उतरत मुक्तपणे संचार करणाऱ्या नागरिकांना झापले. त्यानंतर, शहरातील रस्ते काही वेळातच निर्मनुष्य झाले. दरम्यान, संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी ‘लोकमत’ला दिली.
शहरातील व तालुक्यातील नागरिक केजमध्ये मुक्त संचार करत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शहरात पायी व दुचाकीवरून मुक्त संचार करत असल्याने शनिवारी दुपारी उपजिल्हाधिकारी शरद झाडके केजमध्ये आले. तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे व पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी पाहणी केली. शहरातील बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर थांबून, संचारबंदीमध्ये विनाकारण रस्त्याने दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर, काही वेळातच शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून आले.
विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
कोरोना रुग्णाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करूनही नागरिक विनाकारण रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच जे दवाखान्यात जाण्याचे कारण सांगतात, त्यांनी दवाखान्याचे कागदपत्र जवळ ठेवावे लागतील, असे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
===Photopath===
170421\deepak naikwade_img-20210417-wa0026_14.jpg