शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

घातपाताच्या संशयाला बळ; डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 11:47 AM

Dr. Swapnil Shinde death case : डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे

ठळक मुद्दे मृत्यूचे गूढ आणखी वाढले

नाशिक/ बीड : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ( Strength of suspicion of assassination; How did Dr. Swapnil Shinde's ribs break?) 

डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला असतानाच शवविच्छेदनादरम्यान डॉ. शिंदे यांच्या छातीच्या पिंजऱ्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या असल्याचे समोर आले आहे. मात्र बरगड्या तुटून हृदय किंवा फुप्फुसासारख्या अंतर्गत भागापर्यंत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे ही जखम आयसीयूतील अंतर्गत उपचारादरम्यान झाली असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय वास्तव समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा - स्वप्नीलचे रुग्णसेवेचे स्वप्न अधुरे; नाशिकमध्ये संशयास्पद मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का

याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती. परंतु, त्यांच्या वडिलांनी डॉ. स्वप्निल यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर दोन महिला साथीदारांकडून त्याचा वारंवार छळ होत असल्याची तक्रार करीत संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी सुरू केली असली तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवलास्त्रीरोगतज्ज्ञ विभागात एमडी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेले डॉ. स्वप्निल यांचा मृतदेह महाविद्यालयातील ऑपरेशन थिएटरलगत असलेल्या वॉशरूममध्ये आढळून आल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.मात्र आता शवविच्छेदनातून समोर आलेल्या संशयास्पद बाबींमुळे डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या शवविच्छेदनाचा व्हिसेरा जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूdoctorडॉक्टर