घंटागाडी येईना
अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोजागी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वन्यप्राण्यांची भटकंती
अंबाजोगाई : सर्वच ठिकाणचे पाण्याचे स्तोत्र कमी होत आहेत. येथील वनविभागतील जलस्त्रोतही वाढत्या उन्हाने आटत चालले आहेत. त्यामुळे वनविभागातील वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. पाणवठ्याची पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
खोलीकरण गरजेचे
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी होत आहे.
आवश्यक सेवेला इंधन द्या
अंबाजोगाई : संचारबंदी लागू असली तरी शहरात दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत, अशाच व्यक्तींना पेट्रोल द्यावे जेणेकरून नियम पाळले जातील.