बीड : वाळू प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार अजूनही लटकती आहे. आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या सर्व अधिकारी कर्मचाºयांना गुरुवारी आयुक्तालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यात महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील गेवराई येथील राजापूर येथील मोठ्या वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केली होती. त्यानंतर सर्वत्र अवैध वाळू साठा व वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. दरम्यान वाळू ठेकेदारव व वाहतूकदार यांनी हप्तेखोर महसूल व पोलीस अधिकाºयांचे विभाग व नावासह ‘रेटकार्ड’ व निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अवैध वाळू साठा व वाहतूक बंद व्हावी यासाठी घेतलेल्या बैठकीत पोलीस अधिकाºयासोबत वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांचे वाद झाले होते. त्यानंतर ठेकेदार व वाहतूकदार यांनी थेट जिल्हाधिकारी यांना हप्तेखोर अधिकाºयांची नावे ‘रेटकार्ड’सह निवेदन दिले होते. याच प्रकरणात विधिमंडळात देखील लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आला असून, आ.विनायक मेटे यांनी देखील अधिकाºयांची नावे दिली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी संबंधीत जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानंतर २७ जून रोजी संबंधित निवेदनात नावे असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाºयांना आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर काय कारवाई होते व या चौकशी अहवालात काय निष्पन्न झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या अधिकाºयांना बोलावले चौकशीसाठीआज चौकशीसाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बोलावलेल्या अधिकाºयांमध्ये बीडचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण, गेवराई नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, अभय जोशी, अशोक भंडारी, प्रल्हाद लोखंडे, मंडळ अधिकारी आर. एल. माने, एन,एम. ठाकूर , एस. पी. सोळुंखे, अंगद काशीद, तलाठी राठोड आणि पोलीस विभागातील पोलीस मुख्यालयास जोडलेले पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, बारगजे, विजय देशमुख व पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांचा समावेश आहे.ठेकेदार, वाहतूकदारांना नोटीसवाळू प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील विभागासाह अधिकारी कर्मचाºयांच्या नावाचे ‘रेटकार्ड’ व निवेद वाळू वाहतूक व ठेकेदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानंतर या निवेदनावर स्वाक्षºया असलेल्या काही जणांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातून नोटीसा दिल्या आहेत.यामध्ये यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्वांना नोटीस दिल्या आहेत तर पोलिसांकडून मात्र, फक्त १२ व्यक्तिंना नोटीस दिली होती. तसेच बुधवारी त्यांना सुनावणीसाठी बोलावले असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पुरावे गोळा केले असून, संबंधित अधिकारी कर्मचाºयांवर कारवाई करण्याची व सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
वाळू प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:40 PM
वाळू प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार अजूनही लटकती आहे. आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या सर्व अधिकारी कर्मचाºयांना गुरुवारी आयुक्तालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देआयुक्तांचे चौकशीला हजर राहण्याचे आदेश : वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी दिले होते ‘रेटकार्ड’सह निवेदन