अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्नपुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तक्रारीकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांच्या हल्ल्याची भीती आहे.
पारदर्शक पाइप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाइप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
तारांमुळे धोका वाढला
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून, महावितरणने या तारा बदलण्याची मागणी होत आहे.