शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

दमदार हजेरी, बीड जिल्ह्यात सर्वोत्तम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:10 AM

बीड : तब्बल २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला असला तरी बहुतांश ...

बीड : तब्बल २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला असला तरी बहुतांश ठिकाणी पिकांना अति पावसाचा फटकाही बसला आहे, तर लघु प्रकल्प भरले असून, मध्यम व मोठ्या प्रकल्पांतही पाणीसाठा वाढणार आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस बीड तालुक्यातील पिंपळनेर मंडळात २१४ मिमी नोंदला आहे. मंगळवारी मागील सकाळी ११ वाजेपर्यंत मागील २४ तासांत बीड तालुक्यात ७५.२ मिमी पाऊस नोंदला आहे.

-------------

बीड तालुक्यातील बीड मंडळात १११ मिमी, पाली मंडळात ९९, म्हाळस जवळा १६६, नाळवंडी १९०, पिंपळनेर २१४, पेंडगाव ११८, चौसाळा ७७ आणि नेकनूर मंडळात ८० मिमी पाऊस नोंदला आहे.

-----------------

गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळात ९४ मिमी, मादळमोही ११३, जातेगाव ८४, पाचेगाव ७४, उमापूर १००, चकलांबा ११७, सिरसदेवी ८१ आणि रेवकी मंडळात ७६ मिमी पाऊस झाला.

-------

पाटोदा तालुक्यात, पाटोदा मंडळात ६४, तर अंमळनेर मंडळात १६२ मिमी नोंद झाली.

-----------

आष्टी तालुक्यात आष्टी मंडळात ६६ मिमी, दौलावडगाव १२६, धामणगाव ६७, धानोरा ६९ आणि पिंपळा मंडळात ६६ मिमी पावसाची नोंद झाली.

--------------

वडवणी तालुक्यात वडवणी मंडळात ८८ मिमी, तर कवडगाव मंडळात ११५ मिमी पाऊस झाला.

----

शिरूर कासार तालुक्यात शिरूर मंडळात ६५ व रायमोहा मंडळात ९१ मिमी पाऊस नोंदला.

-----------

परळी तालुक्यातील धर्मापुरी मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली.

---------

अंबाजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर मंडळात १६० मिमी, तर बर्दापूर मंडळात ५५ मिमी पाऊस झाला.

---------

धारूर तालुक्यात धारूर मंडळात ६२

--------

२४ तासांत नोंदलेला पाऊस

बीड १०७.६ मिमी, पाटोदा ८६ मिमी, गेवराई १०२ मिमी, आष्टी ६९ मिमी, माजलगाव ३९ मिमी, केज ४३.६ मिमी, अंबाजोगाई ८८ मिमी, परळी ३२ मिमी, धारूर ४३.८ मिमी, वडवणी १०२ मिमी, शिरूर ७२ मिमी - एकूण ७५.२ मिमी

-------------

जून ते ऑगस्टपर्यंत झालेला एकूण पाऊस

बीड ४८२ मिमी, पाटोदा ५२५ मिमी, आष्टी ४२१ मिमी, गेवराई ५८४ ममी, माजलगाव ६०१ मिमी, अंबाजोगाई ८२६ मिमी, केज ५३९ मिमी, परळी ७०९ मिमी, धारूर ६६७ मिमी, वडवणी ७०४ मिमी, शिरूर कासार ४५० मिमी.

------------

अपेक्षित पाऊस, झालेला पाऊस

जिल्ह्यात जून - जुलैमध्ये २५६ मिमी पाऊस अपेक्षित होता. या कालावधीत ३९१ मिमी पाऊस झाला, तर ऑगस्टमध्ये १३८ मिमी पाऊस अपेक्षित होता. या महिन्यात मोठा खंड पडला तरीही १७८ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अपेक्षित पाऊस ३९४ मिमी होता. मात्र, या तारखेपर्यंत ५७१ मिमी पाऊस झाला आहे.

---------------

अतिवृष्टीचे पंचनामे त्वरित व्हावेत

जिल्ह्यात सर्वत्र उत्तम आणि समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सोयाबीन आणि काढणीला आलेल्या मूग, उडदासह काही पिकांना फटका बसणार आहे. जिल्ह्यात बहुतांश मंडळांत अतिवृष्टी (६५ मिमीपेक्षा जास्त) झाली आहे. काही मंडळात यापेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे या अतिवृष्टीचे पंचनामे करणे आवश्यक असून, महसूल व तहसील विभागामार्फत पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची गरज आहे.

-------------