गेवराई : तीन वर्षांपूर्वी अनाथ, वंचितांसाठी सुरू केलेल्या संघर्ष धान्य बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पौळाचीवाडी येथील समाजसेवक भारत साळुंके यांनी अनेक दिवसांपासून संघर्ष धान्य बँकेच्या स्थापनेची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मराठवाडा मुक्तीदिनाच्या निमित्ताने अनाथ, वंचितासाठी पौळाचीवाडी येथे संघर्ष धान्य बँकेची स्थापना केली. जयवंत मोटे, तुकाराम तळेकर, संघर्ष कन्या लक्ष्मी शिंदे, रामदास पठाडे यांच्या हस्ते धान्य बँकेचे उद्घाटन झाले. संघर्ष धान्य बँक ही आता लोकचळवळ झालेली आहे. अनाथ, वंचित, बेघरांंना अन्न, वस्त्र, निवारा देणारी सामाजिक संस्था म्हणून नावारूपाला येत आहे, अस साळुंके यांनी सांगितले.
याप्रसंगी सुरेश भोपळे, विकास घोडके, तुकाराम तळेकर, सुभाष काळे, शिवाजी झेंडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जयवंत मोटे, तुकाराम तळकर, विष्णू खेडकर, विकास घोडके, मधुकर नवले, राम पोळ, सुधीर दिवटे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष काळे यांनी केले. आभार बाळासाहेब गावडे यांनी मानले.
200921\20bed_1_20092021_14.jpg