शिरूर कासार : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी फळ बागेकडे वळला असुन सध्या उष्णतेचा पारा चढता असल्याने बागांमधील रोप जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. ऊन्हाळ्यात रोप जगवण्यासाठी पाणी पाळी वाढवत आहेत. पाणी कमी पडल्यास रोप करपण्याची दाट शक्यता असते.
शेतातील नांगरटीचे काम उरकले
शिरूर कासार : तालुक्यात गहू, हरभरा आदी पीक काढून मोकळे झालेले शेतात नांगरट करण्याचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे. बांधावरील गवत काडी ,काटेकुट्या जाळण्याकडे आता घाई आहे. तुराट्या ,पल्हाटी वेचनीकडे लक्ष दिले जात आहे.
बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले
शिरूर कासार : सध्या लाॅडाऊन असला तरी बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र लोखंड ,सिमेंट ,वाळू आदि साहित्याचे भाव भरमसाठ वाढले असल्याने अंदाजपत्रक कोलमडून पडत आहे. जवळपास दिडपट भाववाढ झाल्याचे बांधकाम करणारे नागरीक सांगतात. विलिनीकरण असलेले लोक बाजारात
शिरूर कासार : कोरोना टेस्टिंग केल्यानंतर होम क्वारंटाईन असलेले लोक कशाचीही तमा न बाळगता बाजारात फिरत आहेत. शक्यतो बाधित कोण आहे हे माहिती होत नसल्याने रूग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे ,सर्वांनी नियमात राहिले तरच कोरोनाची साखळी तोडणे सोपे होईल, यासाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.